For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विभागीय स्पर्धेत भुषणला सुवर्ण

10:12 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
विभागीय स्पर्धेत भुषणला सुवर्ण
Advertisement

बेळगाव : आंध्रप्रदेश येथील गुंटूर येथे घेण्यात आलेल्या 35 व्या दक्षिण विभागीय ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेमध्ये भुषण पाटील याने प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळवित यश संपादन केले आहे. गुंटूर येथे झालेल्या स्पर्धेत 400 मी. अडथळा शर्यतीत भूषण पाटील याने प्रथम क्रमांक सुवर्णपदक मिळविले. भूषण हा कर्नाटक ॲथलेटिक संघात निवड झाली असून तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. त्याला प्रशिक्षक अमर डुकरवाडकर, ज्ञानेश डुकरवाडकर यांचे मार्गदर्शन लाभत असून भूषण हा खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावचा असून लिंगराज महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला निवृत्त सुभेदार सुनील पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.