भटवाडी दत्तमंदिर ते धोपेश्वरकर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजन
सावंतवाडी । प्रतिनिधी
भटवाडी दत्तमंदिर ते धोपेश्वरकर घरापर्यंत रस्त्याचे भूमिपूजन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.भटवाडी लक्ष्मीनारायण मंदिर समोरील भटवाडी कुणकेरी रस्त्याचे भूमिपूजन रवी नाईक व बाळा कावळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्री प्रमोद भागवत यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य मनोज नाईक, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक नासिर शेख, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर, ॲड. संजू शिरोडकर, हेमंत बांदेकर, मेघना साळगावकर हे मान्यवर उपस्थित होते.
भटवाडी विठ्ठल मंदिर ते धोपेश्वरकर घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ९,१५ ५७४, लक्ष्मीनारायण मंदिर समोरील भटवाडी कुणकेरी रस्ता डांबरीकरण ७,१६,९५१, गुप्ता दुकानापासून ते भटवाडी दत्तमंदिर पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे १२,५१,३११ ही कामे माजी नगरसेवक नासिर शेख व माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या पुढाकाराने होत आहेत.
यावेळी पुरोहित मधूकर कशाळीकर हे पुरोहित म्हणून उपस्थित होते. तसेच प्रमोद भागवत, मधुकर कशाळीकर, चंदन नाईक,उदय अळवनी,वैभव तानावडे,रवी नाईक,सूर्यकांत पाटकर, बाबी गवस, बाळा कावळे, विजय मसुरकर,रमाकांत नाईक, उदय भराडी,सचिन साटेलकर,शानू सुभेदार, राजेंद्र मेस्त्री,सुनील सावंत-भोसले,प्रमोद वेरेकर,भरत गवस,निलम जोशी, मंजिरी धोपेश्वरकर, रसिका नाडकर्णी, प्रदिप कशाळीकर, लज्जिता भालेकर, जय भालेकर, सिमा नाईक,भाग्यश्री कशाळीकर, शशिकला अळवणी, प्रथमेश पेडणेकर हे स्थानिक नागरिक व आदी नागरिक उपस्थित होते.