‘द रॉयल्स’मध्ये भूमी पेडणेकर
दलाल सीरिजमध्येही दिसणार
भूमी पेडणेकर आगामी काळात नेटफ्लिक्सची सीरिज ‘द रॉयल्स’ आणि प्राइम व्हिडिओची थ्रिलर सीरिज दलालमध्ये दिसून येणार आहे. द रॉयल्स ही माझी पहिली सीरिज असून याकरता मी अत्यंत उत्साही आहे. नेटफ्लिक्ससोबत काम करत असून ही एक आकर्षक सीरिज असणार आहे. ही सीरिज कॉमेडी आणि रोमान्सला जोडणारी आहे. झीनत अमान आणि ईशान खट्टर समवेत सर्व कलाकार यात अनेक पैलूंयुक्त अभिनयाचे सादरीकरण करणार असल्याचे भूमीने सांगितले आहे.
प्रियांका घोष आणि नुपूर अस्थानाच्या नव्या रोमँटिक कॉमेडी सीरिजमध्ये उदित अरोरा, लिसा मिश्रा, ल्यूक केनी, विहान समत, नोरा फतेही, डिनो मोरिया, मिलिंद सोमण, चंकी पांडे, काव्या त्रेहान, सुमुखी सुरेश आणि साक्षी तंवर यासारखे कलाकारही दिसून येतील. प्रीतिश नंदी यांनी याची निर्मिती केली आहे. या सीरिजमध्ये रोमान्स, महत्त्वाकांक्षा आणि इच्छा यांनी व्यापलेली कहाणी पहायला मिळणार आहे.
याचबरोबर अभिनेत्री भूमी ही दलाल या सीरिजमध्येही दिसून येणार आहे. ही सीरिज थ्रिलर पसंत करणाऱ्या प्रेक्षकांना आवडू शकते. कारण ही एक मनोवैज्ञानिक थ्रिलरयुक्त असेल. यात भूमीची भूमिका अत्यंत वेगळ्या प्रकारची असणार आहे. यामुळे भूमी या सीरिजवरून अत्यंत उत्सुक आहे.