For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे मुंबई विद्यापीठाच्या ‘आविष्कार-२०२६’ संशोधन अधिवेशन कार्यशाळेचे आयोजन

भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे मुंबई विद्यापीठाच्या ‘आविष्कार २०२६’ संशोधन अधिवेशन कार्यशाळेचे आयोजन
Advertisement

सावंतवाडी/वार्ताहर : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या २१ व्या ‘आविष्कार’ संशोधन अधिवेशन २०२६–२७ अनुषंगाने दोन दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी या कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारी कॉलेजकडे सोपविण्यात आली असून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून यास मान्यता देण्यात आली आहे.

Advertisement

ही कार्यशाळा दि. १ व २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ या वेळेत आचार्य चरक सेमिनार हॉल, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे होणार आहे. १ ऑगस्ट रोजी प्राध्यापकांसाठी, तर २ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेमध्ये मुंबई विद्यापीठाच्या ‘आविष्कार’ संशोधन ओएसडी डॉ. मीनाक्षी नाईक या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी संशोधन अधिवेशनाची संकल्पना, संशोधन विषयांची निवड, संशोधन प्रकल्पाची प्रभावी मांडणी, सादरीकरण कौशल्य, संशोधनातील नावीन्य तसेच अधिवेशनातील सहभागाची प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करून नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधन समन्वयक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील पाटील यांनी केले आहे.

Advertisement

या कार्यशाळेचे आयोजन कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय जगताप व जिल्हा समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर शिरसाट यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा उपसमन्वयक डॉ. उमेश पवार, डॉ. सुमेधा नाईक व कॉलेजच्या आविष्कार समन्वयक प्रा. एस. ए. वेर्णेकर या करत आहेत. आविष्कार समन्वयक प्रा. एस. ए. वेर्णेकर करत आहेत. मुंबई विद्यापीठाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी या महत्त्वपूर्ण कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीवर सोपविल्याबद्दल भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक तसेच सीईओ ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा यांनी समाधान व्यक्त करून कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Tags :

.