नेमळे ते तळवडे जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन
पुलाच्या कामाचे खरे श्रेय रुपेश राऊळांचे ; खा. विनायक राऊत
सावंतवाडी,/प्रतिनिधी:
खासदार विनायक राऊत व अरुण दूधवडकर यांच्या हस्ते नेमळे ते तळवडे जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी नेमळे व तळवडे या दोन गावांना जोडणाऱ्या पुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनातून केली होती. त्यानुसार माजी मुख्यमंत्र्यांनी १ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर केला होता. असे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी केले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, महिला संघटक जानवी सावंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, युवा सेना तालुका संघटक गुणाजी गावडे आबा केरकर आबा सावंत रमेश गावकर आत्माराम राऊळ, शिवराम राऊळ उपतालुका संघटक रूपाली चव्हाण आप्पा परब नेमळे सरपंच सौ दीपिका भैरे,उपसरपंच सखाराम राऊळ, बाळू माळकर,अशोक राऊळ, महिला तालुका संघटक भारती कासार,उपसरपंच सखाराम राऊळ,शाखा प्रमुख सचिन मुळीक,तळवडे सरपंच वनिता मेस्त्री, माजी सरपंच, यशोदा परब हिमांशू परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
लवकरच तळवडे गावचे सुपुत्र स्वर्गीय प्रकाश परब स्मृती प्रित्यर्थ रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले तर गावच्या विकासासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बोलताना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्य काळामध्ये अर्थसंकल्पातून या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे पावसाळ्यामध्ये या दोन्ही गावांचा संपर्क तुटत असेल त्यामुळे येत्या पावसाळ्यापूर्वी पुढील तीन महिन्यात हे काम पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाया पुलाचे श्रेय तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांना जाते त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पुलाला निधी उपलब्ध करून दिला होता असे राऊत म्हणाले.