For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अधिवेशन काळात होणार जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन?

11:01 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
अधिवेशन काळात होणार जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन
Advertisement

बेळगाव : नियोजित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याकडून गती देण्यात आली असून येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. यासाठीच कामाला गती देण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. सध्या असणारे जिल्हाधिकारी कार्यालय अडचणीचे ठरत असल्याने त्याठिकाणी नवीन सहा मजली कार्यालय उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून 100 कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. दोन एकर जागा संपादित करण्यात येणार आहे. सुसज्ज जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत व इतर सरकारी कार्यालयांचा समावेश या एकाच कार्यालयात करण्यात येणार आहे. सध्या याठिकाणी उपनोंदणी कार्यालय, तालुका पंचायत, काडा कार्यालय, बागायत खाते, ग्रंथालय, पॉलिटेक्निक विद्यार्थी वसतिगृह, मागासवर्गीय कल्याण खाते, अन्न व नागरी पुरवठा खाते आदी सरकारी कार्यालये असून यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार सदर जागेतील इमारती जमीनदोस्त करण्यात येणार आहेत, असे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. इमारतीसाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबींची पाहणी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माती परीक्षण विभागाकडून आवश्यक ते अहवाल मिळविण्यात आले आहेत. त्यानुसार कामाला गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आराखड्यालाही जवळपास मंजुरी मिळाली असून यामध्ये काही मोजक्याच त्रुटी असून त्या दूर करण्यात येतील. येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नूतन कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो.

Advertisement

Advertisement
Tags :

.