इम्रान खानच्या चित्रपटात भूमी
लवकरच सुरू होणार चित्रिकरण
मागील काही काळापासून इम्रान खान बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे. इम्रान खानच्या या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून यात इम्रान खानसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे.
इम्रान खान यापूर्वी 2015 मध्ये कट्टी बट्टी या चित्रपटात दिसून आला होता. तर त्याच्या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन दानिश अस्लम करणार असून त्याने यापूर्वी 2010 साली इम्रान आणि दीपिका पदूकोनचा चित्रपट ‘ब्रेक के बाद’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.. 2011 मध्ये प्रदर्शित चित्रपट डेल्ही बेली या चित्रपटाकरताही दानिश आणि इम्रान हे एकत्र आले होते.
इम्रानने 2008 साली जाने तू या जाने ना या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. हा चित्रपट यशस्वी ठरला होता. याचबरोबर त्याने किडनॅप, लक, आय हेट लव्ह स्टोरीज, ब्रेक के बाद, डेल्ही बेली, मेरे ब्रदर की दुल्हन, एक मैं और एक तू, मटरु की बिजली का मंडोला आणि वन्स अपॉन ए टाइम इन मुंबइ दोबारा यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
तर भूमी पेडणेकर ही यापूर्वी मेरे हसबंड की बीवी या चित्रपटात दिसून आली होती.