भोगावती साखर कारखाना निवडणूक : मतमोजणीला सकाळपासून प्रारंभ; दोन फेऱ्यात मोजणी शक्य
दोन फेरीत मोजणी पूर्ण होण्याची शक्यता
भोगावती/प्रतिनिधी
शाहूनगर परिते ता करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी आठ पासून रमणमळा येथील हाँलमध्ये प्रारंभ झाला.केवळ दोन फेरीत मतमोजणी पूर्ण करण्यात येणार पहिल्या फेरीत निकालाचा कल दिसणार असून सायंकाळी पाचपर्यंत सर्व निकाल पूर्ण होण्याची शक्यता आहे.अशी माहिती निवडणूक अधिकारी डॉ निलकंठ करे यांनी सोमवारी दिली.
राधानगरी तालुक्यातील २१ गावातील ३६ केंद्रावर झालेले १० हजार २२१ मतदान पत्रिकांच्या विभागणीचे काम चालू झाले आहे. ही गटवार मतमोजणी दुपारपर्यंत चालेल. त्यानंतर दुसऱ्या फेरीत १३५७२ मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्या फेरीत मोजणीसाठी घेतलेल्यामध्ये ठिकपूर्ली, घोटवडे, कौलव, सिरसे, आमजाई व्हरवडे, आवळी बु।,राशिवडे बु।,येळवडे, वाघवडे, मोहडे, पुंगाव, शिरगांव,कांबळवाडी, तरसंबळे, घुडेवाडी, आवळी खुर्द, कंथेवाडी, तारळे खुर्द,आणाजे, खिंडी व्हरवडे, गुडाळ या गावांचा समावेश आहे.प्रत्येक गावातील मतपेटीतून सभासदांनी चिठ्ठ्याद्वारे उद्रेक व्यक्त केला आहे.
दरम्यान, विरोधी शिवशाहू परिवर्तन विकास आघाडीचे शिवसेनेचे निवास पाटील, शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील,भाजपाचे नामदेव पाटील व डॉ सुभाष पाटील,राजेंद्र पाटील आदी उमेदवारी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे.कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी एन पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील हे जिल्हा बँकेचे संचालक असल्याने व मतमोजणीला सहकारी संस्थांचे सचिव असल्याने मतमोजणी यंत्रणा ताब्यात घेतली आहे. यामध्ये निवडणूक अधिकारी सामिल असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे निवडणुकीची मतमोजणी स्थगित करावी करावी अशी मागणी त्यांनी लेखी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.