For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भोगावतीच्या निवडणुकीसाठी दुपारपर्यंत ६५ टक्के मतदान

11:53 AM Nov 19, 2023 IST | Kalyani Amanagi
भोगावतीच्या निवडणुकीसाठी दुपारपर्यंत ६५ टक्के मतदान
Advertisement

भोगावती प्रतिनिधी

Advertisement

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या शाहूनगर परिते ता करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून प्रारंभ झाला.राधानगरी आणि करवीर तालुक्यातील ५८ गावातील ८२ मतदान केंद्रावर हे मतदान घेण्यात येणार आहे.

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी दुपारपर्यत ६५ टक्के मतदान झाले.सकाळच्या सत्रामध्ये मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी तुरळक गर्दी होती.परंतु सकाळी १० नंतर मतदान केंद्रावर गर्दी होऊ लागली.मात्र कोदवडेत दुपारीच ९६ टक्के मतदान पूर्ण झाले असून बाकीचे मतदार मयत आहेत.

Advertisement

राधानगरी, करवीर तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यातील घोटवडे,गुडाळ,राशिवडे बु,कंंथेवाडी,येळवडे तर करवीरमधील हसुर दु,सडोली खा,कोथळी,बेले ,म्हाळुंगे या मतदानकेंद्रावर साडेबारा पर्यंत ५० टक्के मतदान झाले.एका मतदाकेंद्रावर तीन ते चार टेबल असल्याने मतदान प्रक्रिया गतीने होत होती.

राधानगरी, करवीर तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यातील घोटवडे,गुडाळ, राशिवडे, कसबा तारळे ,कंंथेवाडी,येळवडे तर करवीरमधील हसुर दु,सडोली खा,कोथळी,बेले ,म्हाळुंगे या मतदानकेंद्रावर सरासरी साठ ते पासष्ट टक्के मतदान झाले.एका मतदाकेंद्रावर तीन ते चार टेबल असल्याने मतदान प्रक्रिया गतीने होत होती.राधानगरी तालुक्यातील कोदवडे गावामध्ये ९६ टक्के मतदान झाले.सतारुढ आघाडीचे आमदार पी.एन.पाटील व संपतराव पवार यांनी सडोली केंद्रावर,गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळेंनी घालून घोटवडे येथे तर विरोधी परिवर्तन आघाडीचे हंबीरराव पाटील यांनी हळदी,सदाशिवराव चरापले व त कै.कौलवकर पँनेलचे धैर्यशील पाटील यांनी कौलव केंद्रावर मतदान केले. मतदान प्रक्रीया शांततेत सुरु आहे.

Advertisement
Tags :

.