For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कसबा बीडमध्ये उत्साहात भीमजयंती साजरी ! विविध कार्यक्रमांतून बाबासाहेबांना अभिवादन

08:53 PM Apr 15, 2024 IST | Abhijeet Khandekar
कसबा बीडमध्ये उत्साहात भीमजयंती साजरी   विविध कार्यक्रमांतून बाबासाहेबांना अभिवादन
Kasba Beed
Advertisement

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती कसबा बीडमध्ये परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. भीम जयंतीच्या औचित्याने गावात दिवसभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्साहपुर्ण वातावरणात पार पडलेल्या जयंतीमध्ये गावातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरीकांनी उत्साहाने भाग घेतला.

Advertisement

सकाळच्या सत्रात झालेल्या कार्यक्रमाची सुरवात बुद्धवंदना आणि प्रतिमेला अभिवादन करून झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेबांच्या नविन पुतळ्याचे अनावरण गावचे सरपंच उत्तमराव वरूटे यांच्या हस्ते केले. यावेळी भीमसैनिकांनी बाबासाहेबाच्या विचारांचा जागर केला.

Advertisement

संध्याकाळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीला गावातील जनसमुदाय लोटला होता.पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेली मिरवणूक अतिशय आकर्षक सजली होती. गावातील मुख्य रस्त्यावरून जाताना फटाक्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली.
गावातील भीमजयंतीला माजी बाजार समिती सदस्य शामराव सुर्यवंशी, माजी सरपंच सत्यजित पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सुर्यवंशी, अमित वरूटे, विलास कांबळे ग्राम. सदस्य महेश जोगडे, संतोष पाटील, सागर पाटील, सरिता खांडेकर यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी उपस्थिती दर्शवून बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

Advertisement
Tags :

.