For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांना मिळाली जीवे मारण्याची धमकी

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांना मिळाली जीवे मारण्याची धमकी
Advertisement

लखनौ : उत्तरप्रदेशच्या नगीना मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणारे भीम आर्मी प्रमुख तसेच आझाद समाज पक्षाचे संस्थापक चंद्रशेखर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी आसप नेते करणवीर सिंह यांनी पोलीस स्थानकात जात तक्रार नोंदविली आहे. सोशल मीडियावर धमकीचा एक ऑडिओ व्हायरल झाल्याचे करणवीर सिंह यांनी सांगितले आहे. या ऑडिओत एक युवक चंद्रशेखर यांच्यावर गोळी झाडणार असल्याचे म्हणत असल्याचे ऐकू येते. हा युवक नेमका कोण हे अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी आसपकडून पोलीस अधिकाऱ्यांकडे संबंधित ऑडिओ क्लिप समवेत तक्रारीचे पत्र सोपविण्यात आले आहे. सुमारे 8 महिन्यांपूर्वी चंद्रशेखर यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. या घटनेत चंद्रशेखर हे किरकोळ जखमी झाले होते. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. याचबरोबर काही दिवसांपूर्वी मेरठमधील एका व्यक्तीने चंद्रशेखर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.