For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांदा ग्रामस्थांचे प्रजासत्ताकदिनी "भीक मांगो" आंदोलन

04:41 PM Jan 11, 2024 IST | अनुजा कुडतरकर
बांदा ग्रामस्थांचे प्रजासत्ताकदिनी  भीक मांगो  आंदोलन
Advertisement

BSNL कडुन तत्पुर्वी टॉवर सुसज्ज करण्याची हमी

Advertisement

प्रतिनिधी । सावंतवाडी 

भारत संचार निगमच्या मनमानी सेवेने बांद्यातील त्रस्त नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येत सावंतवाडीतील भारत संचार निगमच्या कार्यालयात जोरदार धडक दिली.यावेळी बांदा व परिसरातील ५० नागरिक उपस्थित होते.त्यांच्याकडून भारत संचार निगमचे सिंधुदुर्ग उप- महाप्रबंधक, श्री.आर.व्ही जानू यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.यावेळी बांदा मराठा समाज सचिव आनंद वसकर यांच्याकडून अधिकाऱ्यांना ढिसाळ सेवेबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर अधिकाऱ्यांना कोणतेही समर्पक उत्तर देता आले नाही. श्री.गुरुदास गवंडे यांच्याकडून ग्रामीण भागातील मोबाईल धारकांच्या अनेक समस्या मांडण्यात आल्या. तसेच फ्रीक्वेन्सीबाबत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. तसेच अक्षय परब यांच्याकडुन सोलर सिस्टिम बसवण्याकरिता त्वरीत प्रस्ताव पाठवण्याची मागणी करण्यात आली.

Advertisement

सामाजिक कार्यकर्ता गुरु कल्याणकर व हेमंत दाभोळकर यांनी वीज बंद झाल्यावर बॅटरी बॅकअप नसल्याने रेंज नसते. इंटरनेट बंद झाल्याने बँकिंग OTP,UPI, तसेच इतर आर्थिक व्यवहारावर परीणाम होतो व लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे २६ जानेवारी पूर्वी बांदा टॉवर बॅटरीने सुसज्ज न झाल्यास २६ जानेवारी रोजी भारत संचार निगमकडे पैसे नसल्याने त्यांच्याकरिता अधिकाऱ्याना सोबत घेऊन भारत संचार निगमच्या कार्यालयासमोर "भीक मांगो"आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. यावर उप- महाप्रबंधक श्री.जानु यांच्याकडून उपस्थित नागरिकांना २५ जानेवारी पर्यंत बांदा टॉवर बॅटरीने सुसज्ज करू असे लेखी आश्वासन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर,हेमंत दाभोळकर, गुरुदास गवंडे,आनंद वसकर,सागर मोर्ये,अक्षय परब, चिन्मय नाडकर्णी, मिलिंद सावंत, प्रथमेश गडकरी, विष्णु वसकर, प्रथमेश परब, रोहित रेडकर, महेश वसकर, प्रदीप कळंगुटकर, कौस्तुभ दळवी, सदाशिव मोर्ये आदी नागरीक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.