For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भेंडीबाजार गणेश मंडळातर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

10:37 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
भेंडीबाजार गणेश मंडळातर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार
Advertisement

बेळगाव : पहाटेच्या वेळी लवकर उठून शहर साफ करण्याचे काम महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी करत असतात. त्यांचे काम हे अत्यंत कष्टाचे तसेच पर्यावरण आणि आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. त्याची दखल घेत अमृतमहोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मोतीलाल चौक, भेंडीबाजार यांच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. रस्ते झाडायचे, त्यानंतर कचरा गोळा करायचा, तो कचरा वाहनात भरून पाठवायचा, गटारी साफ करायच्या, हे नेहमीचेच काम. गणेशोत्सव काळात अधिकच ताण पडत असतो. त्यामुळे या गणेशोत्सवात त्याची दखल घेत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला आहे. यावेळी गल्लीतील व्यापारी, नागरिक तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.