For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भेलचा समभाग 44 टक्के वधारला

06:45 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
भेलचा समभाग 44 टक्के वधारला
Advertisement

मुंबई :

Advertisement

भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड अर्थात भेल यांचा समभाग गेल्या चार महिन्यात दमदार वाढताना दिसला आहे. सदरच्या समभागाने सदरच्या कालावधीत जवळपास 44 टक्के इतका परतावा दिला आहे. यायोगे समभाग 17 महिन्यानंतर उच्चांकावर पोहचला आहे. बीएसईवर बुधवारी सदरचा समभाग 3 टक्के इतका वाढत 305 रुपयांवर पोहचला आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीचा समभाग ऑगस्ट 2024 नंतर पुन्हा उच्चांकाकडे वाटचाल करतो आहे. कंपनीचा तिमाही निकाल 19 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. त्याचदिवशी संचालक मंडळाची बैठक घेतली जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.