भाविना, प्रमोद आशियाई पॅरा स्पर्धेत भारताचे ध्वजवाहक
06:44 AM Oct 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
Advertisement
जपानमधील नागोया येथे 18 ते 24 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई पॅरा गेम्सच्या उद्घाटन समारंभात पॅरालिम्पिक पदकविजेते प्रमोद भगत आणि भाविना पटेल भारतीय पथकाचे ध्वजवाहक असतील.
भारताचे ध्वजवाहक आणि त्यांची कामगिरी
Advertisement
भारताचे अत्यंत यशस्वी पॅरा-बॅडमिंटनपटू भगतने 2014-2023 या काळात आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्ण आणि चार कांस्य पदकांसह एकूण सहा पदके जिंकली आहेत. भाविना पटेल ही एक आघाडीची पॅरा टेबल टेनिसपटू असून तिने 2018 ते 2023 दरम्यान आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन पदके (एक रौप्य आणि कांस्य) जिंकली आहेत. आयची-नागोया 2026 आशियाई पॅरा गेम्समध्ये संपूर्ण खंडातील पॅरा-खेळाडू एकत्र येणार आहेत आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील आपल्या वाढत्या यशाची ही मालिका पुढे चालू ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
Advertisement
