For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘चांगभलं’च्या गजरात भावेश्वरी यात्रेला प्रारंभ

11:26 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘चांगभलं’च्या गजरात भावेश्वरी यात्रेला प्रारंभ
Advertisement

सुमारे 2 लाख भाविकांनी घेतले दर्शन : दिवसभरात कोट्यावधींची उलाढाल : भावेश्वरी देवी पाटील ट्रस्टतर्फे यात्रेकऊंना लाडू वाटप

Advertisement

वार्ताहर /दड्डी

‘चांगभलं’च्या गजरात भावेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी 5 हजार भाविकांनी शस्त्र इंगळीचा लाभ घेतला. रविवारी देवीच्या दर्शनासाठी 2 लाख भाविकांनी हजेरी लावली असून संपूर्ण मोदगा गाव भाविकांनी फुलून गेला आहे. भाविकांना यंदापासून प्रसाद म्हणून लाडू देण्यात येत आहेत.  बेळगाव, गोवा, महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने मोदगा गावात दाखल होत आहेत. मंदिर परिसरात रांगेतून दर्शनाची सोय करण्यात आली आहे.  गावानजीकची शेतवाडी भाविकांनी फुलून गेली आहे. चांगभलंच्या गजरात भाविकांकडून भंडाऱ्यांची उधळण करण्यात येत असल्याने मंदिर परिसरात भंडाऱ्यांचा खच पडला आहे.  तालुका प्रशासनाने यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शुद्ध पाणी व 24 तास वीजपुरवठा करण्यात आल्यामुळे यात्रेकरुंना सोयीचे झाले आहे. रविवार दिवसभरात कोट्यावधी ऊपयांची आर्थिक उलाढाल झाली. भाविक व यात्रेकऊंच्या आरोग्यासाठी खास वैद्यकीय सेवा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. देवीचे दर्शन देण्यासाठी भावेश्वरी देवी पाटील ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष भाऊराव पाटील, सचिव संतराम पाटील, चंद्रकांत पाटील, सुधाकर पाटील, भागोजी पाटील, अशोक पाटील, नंदकुमार पाटील, माऊती पाटील व अप्पा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.