For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Tuljhapur : शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता

06:12 PM Jan 04, 2026 IST | NEETA POTDAR
tuljhapur   शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता
Advertisement

                           तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सवात प्रथमच भव्य ड्रोन शो

Advertisement

तुळजापूर : तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित अत्याधुनिक ड्रोन शो आज भक्तिमय वातावरणात पार पडला, धाराशिव जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या ड्रोन शोने भाविकांचे लक्ष वेधून घेतले असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि धार्मिक परंपरेचा सुंदर संगम यानिमित्ताने अनुभवता आला.

कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी देवींचे पूजन करून करण्यात आली. यावेळी जिल्ला परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, नगराध्यक्ष विनोद गंगणे, सौमय्याश्री पुजार, तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, पुजारी मंडळाचे अध्यन विपिन शिंदे, तेरखेडा फटाका असोसिएशनचे अध्यक्ष फरीद पठाण, अलियाज दारूवाले, तय्यब हुसेन दारूवाले, मंदिर संस्थानचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी,तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यापूर्वी तुळजाभवानी शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सव २०२५ अंतर्गत २९ सप्टेंबर रोजी हा ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

मात्र, सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव तो स्थगित करावा लागला होता. शाकंभरी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत आज तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर हा ड्रोन शो यशस्वीपणे पार पडला. ड्रोन शोमध्ये तब्बल ३०० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रतिकृती साकारण्यात आल्या. यामध्ये तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती, तुळजाभवानी देवीची दिव्य प्रतिकृती, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर आकर्षक प्रतिकृतीचा समावेश होता.

Advertisement
Tags :

.