For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भावेश्वरीदेवी यात्रोत्सव आजपासून

02:55 PM Feb 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भावेश्वरीदेवी यात्रोत्सव आजपासून
Advertisement

विविध कार्यक्रमाचे आयोजन : उद्या यात्रेचा मुख्य दिवस

Advertisement

वार्ताहर/दड्डी

कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भावेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला सोमवार दि. 2 पासून सुरुवात होणार आहे. भाविकांनी शांततेत देवदर्शन घ्यावे, असे आवाहन श्री भावेश्वरी देवी पाटील ट्रस्ट कमिटी यांनी केले आहे. सोमवार दि. 2 रोजी सायंकाळी 6 ते मंगळवार 3 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शस्त्र इंगळ्याचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार 3 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी महानैवद्य, दंडवत आदी कार्यक्रम होणार आहेत. बुधवार 4 रोजी पालखी सोहळा होणार असून पालखी सोहळ्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेकरूंसाठी बेळगाव, संकेश्वर, गडहिंग्लज आगारातून जादा बसेसच्या सुविधा करण्यात आल्या आहेत. यात्रेच्या काळात पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा व 24 तास विजेची सुविधा करण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटप्रभा नदे भरलेली असून भाविकांनी मोदगे बंधाऱ्यावरूनच वाहतूक करावी, असे आवाहन कमिटीने केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.