कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सांगेली कनिष्ठ महाविद्यालयातून भावना खोत प्रथम

05:28 PM May 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वाणिज्य व विज्ञानचा निकाल १००%
तर कला शाखेचा निकाल ९२.३०%

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
सांगेली येथील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या एच एस सी परीक्षेचा वाणिज्य आणि विज्ञान या दोन्ही शाखांचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ९२.३० टक्के लागला. या कनिष्ठ महाविद्यालयाचा तिन्ही शाखांचा मिळून ९९.०९% असुन या महाविद्यालयाने गौरवशाली यशाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. या महाविद्यालयातून कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमधुन बारावी परीक्षेला बसलेले १११ पैकी ११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ४८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत, ४८ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत तर उर्वरीत ७ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी प्राप्त केली.
महाविद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे कला शाखा १३ पैकी १२ विद्यार्थी उत्तीर्ण - प्रथम क्रमांक कु. भावना श्रीकांत खोत (४८३/८०.५०%), द्वितीय क्रमांक कु साक्षी संतोष मेस्त्री (३३८/५६.३३%), तृतीय क्रमांक कु जान्हवी संतोष सावंत (३२७/५४.५०%), वाणिज्य शाखा २८ पैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण- प्रथम क्रमांक कु. गायत्री महादेव देसाई (४०२/६७%), द्वितीय क्रमांक कु. भक्ती निलेश देवळे आणि कु रसिक लाडजी कोरगावकर प्रत्येकी (३७२/६२%), तृतीय क्रमांक कु. शुभम एकनाथ मेस्त्री (३७०/६१.६७%). विज्ञान शाखा ७० पैकी ७० विद्यार्थी उत्तीर्ण प्रथम क्रमांक कु नंदिनी नितीन धुरी (४६६/७७.६७%), द्वितीय क्रमांक कु वैष्णवी पुनाजी धुमक (४६२/७७%), तृतीय क्रमांक कु स्वराली नितीन सामंत (४६१७६.८३/%) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री गिरिजानाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ पु राऊळ, सचिव विश्वनाथ रामचंद्र राऊळ, प्राचार्य रामचंद्र घावरे, सर्व संस्था पदाधिकारी व शिक्षक व कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # 12 th result # sangeli
Next Article