भाऊंच्या कॉलच रेकॉर्डींग झालं व्हायरल
सत्ताधारी पक्षातील "भाऊंची"खंडणीसाठी कोली दादागिरी?
कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
कोल्हापूर
कोल्हापुरात येऊन व्यापार करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. कोल्हापुरातील कुख्यात 'भाऊ'चा प्रताप उघड झाला आहे. सत्ताधारी पक्षातील महत्त्वाचा पदाधिकारी असलेल्या भाऊचा फोन रेकॉर्ड समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे.
कोल्हापुरात हॅण्डलूम व्यवसायिकांकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागून त्यांना अर्वाच्च शिवीगाळ केल्याचं फोन रेकॉर्ड मधून उघड झाले आहे. गेल्या रविवारी कोल्हापुरातील दसरा चौकात भरवण्यात आलेल्या हँडलूमचा मांडव अचानक पडल्याने, या चर्चेला उधाण आहे. भाऊंचा त्रास वारंवार होत असल्याने पुन्हा कोल्हापुरात व्यापारासाठी न येण्याचा व्यापाऱ्यांचा पवित्रा असल्याचेही समोर आले आहे.
कोल्हापूरातील दसरा चौक येथे २० जानेवारीपासून एक ‘हॅंडलूम एक्स्पो’ प्रदर्शन सुरू होते. पण रविवारी दुपारी अचानकपणे या प्रदर्शनाचा मंडप कोसळला. मंडप पडला की पाडला? याबाबत शहरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. या घटनेनंतर कोल्हापूरात आपण पुन्हा पाय ठेवणार नाही, अशा तीव्र भावना मंडपातील विविध व्यावसायिकांकडून व्यक्त झाल्या होत्या. अर्थात असा अनुभव यापूर्वी बाहेरील अनेक व्यावसायिकांना आला आहे. त्यामुळे कोल्हापूरात येणाऱ्या बाहेरील व्यावसायिकांकडून पाठ फिरवली जात आहे. बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांनी कोल्हापूरात व्यवसाय करायचा की नाही? असे चित्र बनू लागले आहे. त्यामुळे उद्योग, व्यावसायिकांना होणारा अप्रत्यक्ष त्रास कमी करण्यासाठी कारवाईची गरज आहे. अशातच आता हा फोन रेकॉर्ड व्हायरल झाल्याचे समोर आले आणि पुन्हा एकदा सगळीकडे चर्चेला उधाण आले.