भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश
बेळगाव : बेळगाव येथील अंजुमन महाविद्यालय आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाऊराव काकतकर कॉलेजच्या महिला संघाने विजेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेत 4 सुवर्ण, 3 रौप्य व 3 कास्य पदकासह 10 पदकांची कमाई केली आहे. अंजुमन महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या महिला खेळाडू ऋतिका बांडगीने 63 किलो वजनी गटात सुवर्णपदकासह युनिर्व्हसिटी ब्ल्यू, ऋतुजा सामंतने 48 किलो वजनी गटात सुवर्णपदकासह युनिर्व्हसिटी ब्ल्यू, वैष्णवी लोहारने 53 किलो वजनी गटात सुवर्णपदकासह युनिर्व्हसिटी ब्ल्यू किताब पटकाविला तर ज्योती चौगुले, योगेश्वरी बिजगरकर, सानिका पाटील यांनी रौप्यपदक तर भक्ती कोकीतकर, नम्रता पाटील, कोमल पाटील यांनी कांस्यपदक पटकाविले. विजेत्या स्पर्धकांची डिसेंबरमध्ये भोपाळमध्ये होणाऱ्या आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व खेळाडूना कॉलेजचे क्रीडा प्राध्यापक सुरज पाटील तसेच युवजन क्रीडा खात्याचे प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी यांचे मार्गदर्शन, प्राचार्य डॉ. एम. व्ही. शिंदे व इतर प्राध्यापकांचे प्रोत्साहन लाभत आहे.