For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भातकांडे हायस्कूलच्या खेळाडूंचा गौरव

11:58 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
भातकांडे हायस्कूलच्या खेळाडूंचा गौरव
Advertisement

बेळगाव : येथील गजाननराव भातकांडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यानिमित्त विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळा नुकताच शाळेत मोठ्या उत्साहात झाला. अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात अष्टपैलू प्रगतीवर भर दिला पाहिजे, असे प्रमुख पाहुण्या मैत्रेयी बैलूर म्हणाल्या. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, मुख्याध्यापिका दीपा ए. सी. आणि शाझिया जमादार उपस्थित होते.

Advertisement

क्रीडा क्षेत्रातील यशाचा आलेख

शाळेच्या विद्यार्थ्यांनी फुटबॉल, क्रिकेट, स्केटिंग, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती आणि कराटे अशा विविध क्रीडा प्रकारांत चमक दाखवली आहे

Advertisement

  • फुटबॉल : शाहपूर क्लस्टर“ झोनल स्तरावर मुलींच्या 17 वर्षांखालील संघाने विजेतेपद पटकावले. तसेच ‘स्प्रिंग स्पिरिट“ स्पर्धेत 14 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. मुलांच्या 17 वर्षांखालील संघाने सर्वात शिस्तबद्ध संघ“ हा बहुमान मिळवला.
  • क्रिकेट : दासाप्पा शानभाग“ स्पर्धेत 16 वर्षांखालील संघ विजेता ठरला, तर हनुमान स्पोर्ट्स ट्रॉफी“मध्ये उपविजेतेपद पटकावले. याशिवाय, औदुंबर हिशोबकर आणि मीर मिर्जी यांची 17 वर्षांखालील एसजीएफआय नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
  • स्केटिंग : शल्य तारळेकर हिने एसजीएफआय राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पयिनशिपमध्ये 4 सुवर्ण पदके जिंकून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
  • जिम्नॅस्टिक्स : राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये अनन्या पाटीलने रौप्यपदक पटकावले.
  • कुस्ती : राज्यस्तरीय स्पर्धेत माऊली चौगुलेने कांस्यपदक मिळवले.
  • कराटे : राज्यस्तरीय विद्या भारती“ स्पर्धेत समीक्षा गुंडकल आणि सायली गुंडकल यांनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

विजेत्या स्पर्धकांना क्रीडा शिक्षक मॅथ्यू लोबो, हर्ष रेडेकर, रुपेश पावले यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement
Tags :

.