महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंडिगोचे प्रवर्तक भाटिया यांनी विकली हिस्सेदारी

07:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई 

Advertisement

इंडिगो एअरलाइन्स चालवणारी कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनचा समभाग बुधवारी  4.22टक्क्यांनी घसरला आहे. 83.7 लाख समभागांच्या ब्लॉक डीलनंतर ही घसरण दिसून आली आहे. ब्लॉक डील 4,406 च्या सरासरी किमतीत 3,689 कोटी रुपयांना झाल्याची माहिती मिळते आहे. एका दिवसापूर्वी, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, कमी किमतीची एअरलाइन इंडिगोचे प्रवर्तक राहुल भाटिया यांची होल्डिंग कंपनी इंटरग्लोब एंटरप्रायझेस 2 टक्के हिस्सा विकण्याची योजना आखत आहे. राहुल भाटिया आणि त्यांच्या कुटुंबाची इंडिगोमध्ये 37.75 टक्के हिस्सेदारी होती.

Advertisement

समभागांचा 47 टक्के परतावा

इंडिगो एअरलाइन्सच्या समभागांनी यावर्षी गुंतवणूकदारांना 47 टक्केपेक्षा जास्त परतावा दिला आहे. 1 जानेवारीला शेअरची किंमत 2978 रुपये होती, ती आता वाढून सुमारे 4,384 झाली. इंडिगोने वर्षात सुमारे 81 टक्के परतावा दिलाय.

चौथ्या तिमाहीत नफ्यात 106 टक्के वाढ

इंडिगोने गेल्या महिन्यात चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा वार्षिक 106 टक्क्यांनी वाढून 1894.8 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 919.20 कोटी रुपये होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article