For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : महायुतीवर घराणेशाहीचा आरोप

12:30 PM Jun 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ratnagiri news   महायुतीवर घराणेशाहीचा आरोप
Advertisement
                                 ठाकरे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी डागली तोफ
Advertisement

रत्नागिरी: कोकण विधानपरिषद रणसंग्रामासाठी निवडणुकीच्या महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व आमदार भास्कर जाधव यांनी महायुती आणि त्यांचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. एकाच घराण्याला वारंवार संधी का? असा थेट सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. 

माने यांचा उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर आमदार जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तटकरे यांनी कोकणच्या विकासासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेमके काय काम केले, याचे उत्तर जनतेला मिळायला हवे, असे ते म्हणाले. 
महायुतीमधील नाराजी आणि मतभेदांवर भाष्य करताना जाधव यांनी निवडणुकीच्या निकालाचे भाकीत वर्तवले. महायुतीमध्ये इच्छुकांची मोठी फौज आहे आणि अनेक जण एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या काळात हे घटक पक्ष एकमेकांना कितपत सहकार्य करतील, यावरच या निकालाचे गणित अवलंबून आहे, असे जाधव यावेळी म्हणाले.  
भाजपवर 'आयात' नेतृत्वाचा टोला
स्वतःचे हक्काचे नेतृत्व निर्माण करण्यात भाजप अपयशी ठरला आहे. दुसऱ्या पक्षांतील तयार नेतृत्व आयात करून त्यांना उमेदवारी द्यावी लागते, हाच भाजपचा नैतिक पराभव आहे, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला आहे.
Advertisement
Tags :

.