For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपाचे भर्तृहरी महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष

07:00 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपाचे भर्तृहरी महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 18 व्या लोकसभेसाठी भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्ष (प्रोटेम स्पीकर) म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुऊवारी ही माहिती दिली. महताब हे लोकसभा अध्यक्षांची निवड होईपर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील. 18 व्या लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याची प्रक्रिया हंगामी अध्यक्षांच्या उपस्थितीत पूर्ण केली जाणार आहे.

पुढील आठवड्यात लोकसभेचे अधिवेशन होणार असून पहिल्या तीन दिवसात नवनिर्वाचित खासदारांचा शपशविधी कार्यक्रम पार पडेल. याप्रसंगी हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांना मदत करण्यासाठी राष्ट्रपतींनी घटनेच्या कलम 99 नुसार, लोकसभा सदस्य सुरेश कोडीकुन्नील, थलिकोट्टाई राजुतेवर बालू, राधामोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंडोपाध्याय यांची नियुक्ती केली. हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले भाजप खासदार भर्तृहरी महताब हे ओडिशातील भाजपचे खासदार आहेत. त्यांनी कटक मतदारसंघातून बीजेडीचे नेते संतरूप मिश्रा यांचा 57,077 मतांनी पराभव केला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.