For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारती हेक्साकॉमचा आयपीओ येणार

06:45 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारती हेक्साकॉमचा आयपीओ येणार
Advertisement

दुसऱ्या दूरसंचार कंपनीचा प्रवेश : सेबीने एअरटेल कंपनीच्या आयपीओला दिली मान्यता

Advertisement

नवी दिल्ली :

आणखी एक टेलिकॉम कंपनी लवकरच बाजारात उतरणार आहे. भारती एअरटेलची उपकंपनी भारती हेक्साकॉमला आयपीओद्वारे निधी उभारण्यासाठी सेबीची मंजुरी मिळाली आहे. ऑफर फॉर सेलअंतर्गत (ओएफएस), 10 कोटी शेअर्स टेलिकॉम कंसल्टस इंडिया लिमिटेडद्वारे विकले जातील. हेक्साकॉमच्या आयपीओमध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत आणि ते पूर्णपणे ऑफर-फॉर-सेलवर आधारित असेल.

Advertisement

ओएफएसच्या माध्यमातून, कंपनीचा एकमेव सार्वजनिक भागधारक, टेलिकॉम कंसल्टस इंडिया, 10 कोटी समभागांची विक्री करेल. याचा अर्थ आयपीओमधून मिळणारी संपूर्ण रक्कम कंपनीकडे जाणार नाही तर टेलिकॉम कंसल्टस इंडिया  कडे जाईल. सेबीने 11 मार्च रोजी त्यांच्या आयपीओ अर्जावर एक निरीक्षण पत्र जारी केले होते.

कंपनी बद्दल.......

कंपनी राजस्थान आणि उत्तर-पूर्व भागात दूरसंचार सेवा पुरवते. भारती एअरटेल कंपनीचा वाटा  70 टक्के आणि टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट्स ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत सरकारचा वाटा 30 टक्के आहे. ग्राहकसंख्येच्या बाबतीत हे सर्वोच्च जागतिक मोबाइल ऑपरेटरपैकी एक आहे.

Advertisement
Tags :

.