भारती एअरटेलचा स्पेसेक्ससोबत करार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेअर बाजार बंद झाल्यानंतर संध्याकाळी भारती एअरटेल यांनी एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसेक्ससोबत करार केला असल्याची माहिती दिली आहे. हा अत्यंत महत्त्वाचा असा करार असणार असून आगामी काळात वेगवान इंटरनेट सेवा देण्यासाठी भारती एअरटेलचे प्रयत्न असणार आहेत. भारती एअरटेलने स्पेसेक्ससोबत एक करार केला असून त्या अंतर्गत स्टारलिंकची वेगवान इंटरनेट सेवा भारतीय ग्राहकांना मिळू शकणार आहे. या कराराच्या माध्यमातून देशभरातील दुर्गम भागामध्ये इंटरनेट सेवा पोहोचविण्याचे प्रयत्न कंपनीकडून केले जाणार आहेत. दुर्गम भागामध्ये ब्रॉडबॅण्ड सेवा पोहोचविण्याबरोबरच ग्राहकांना अत्याधुनिक इंटरनेट सेवा देण्याचेही उद्दिष्ट भारती एअरटेलने समोर ठेवले आहे. ग्राहकांसोबत स्टारलिंकची सेवा उद्योग ते व्यावसायिकांपर्यंतही सव ा&ंना उपलब्ध होणार आहे.
काय म्हणाले चेअरमन
भारती एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी 21 फेब्रुवारी दरम्यान कंपनीकडे भारतामध्ये सॅटलाईटद्वारे सेवा देण्याची क्षमता आहे, असे वक्तव्य केले होते. मंगळवारी मित्तल यांनी याबाबत खुलासा करताना स्पेसेक्ससोबत करार झाल्याची माहिती दिली. स्टारलिंकमार्फतच ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा भारती एअरटेल तमाम ग्राहकांपर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.