For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनिर्णित सामन्यात भरतचे शतक

06:23 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनिर्णित सामन्यात भरतचे शतक
Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सरावाचा प्रथमश्रेणी सामना शनिवारी अनिर्णित राहिला. या सामन्यात भारत अ संघातील कोना भरतने नाबाद शतक झळकवले.

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या क्रिकेट कसोटीसाठी भारतीय संघामध्ये निवड समितीने कोना भरतला संधी दिल्याने निवड समितीवर बरेच आरोप सुरू झाले. दरम्यान भरतने या सरावाच्या सामन्यात नाबाद 116 धावांची खेळी करत आगामी कसोटी मालिकेसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले.

Advertisement

या सामन्यात इंग्लंड लायन्सला पहिल्या 553 धावा जमवल्या. त्यानंतर भारत अ संघाचा पहिला डाव 227 धावात आटोपला. इंग्लंड लायन्स संघाने आपला दुसरा डाव 6 बाद 163 धावावर घोषित करून भारत अ संघाला विजयासाठी 490 धावांचे आव्हान दिले. भारत अ संघाने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करत 125 षटकात 6 बाद 425 धावा जमवत हा सामना अनिर्णित राखला. कोना भरतने 165 चेंडूत 15 चौकारासह नाबाद 116 तर मानव सुतारने 254 चेंडूत 16 चौकारासह 89 धावा झळकवल्या. साई सुदर्शनने 97 धावांची खेळी केली. कोना भरत आणि सुतार यांनी सहाव्या गड्यासाठी 207 धावांची अभेद्य भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड लायन्स प. डाव 553, दु. डाव 6 बाद 163 डाव घोषित, भारत अ प. डाव 227, दु. डाव 6 बाद 425 (कोना भरत नाबाद 116, मानव सुतार नाबाद 89, साई सुदर्शन 97).

Advertisement
Tags :

.