महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑक्टोबर 2023 मध्ये प्रथमच ‘भारतपे’ नफा कमाईत

06:13 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

फिनटेक युनिकॉर्न ‘भारतपे’ने ऑक्टोबरमध्ये करपूर्व कमाईमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि वार्षिक महसूल 1,500 कोटी रुपयाचा टप्पा पार केला आहे.  ‘भारतपे’ने एका निवेदनात म्हटले आहे की हे सर्व व्यवसाय विभागांमध्ये सातत्यपूर्ण होत असलेल्या वाढीमुळे शक्य झाले आहे.

Advertisement

कंपनीने सांगितले की, ‘ऑक्टोबर 2023 मध्ये तिची करपूर्व कमाई सकारात्मक झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या (एप्रिल 2022 ते मार्च 2023) तुलनेत 31 टक्क्यांनी कमाई वाढली आहे.

‘भारतपे’च्या मते, मागील काही महिन्यांत कर्ज विभागात स्थिर वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये एनबीएफसी भागीदारांसोबत भागीदारी करून आपल्या व्यापाऱ्यांना 640 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या क्रेडिट सुविधा उपलब्ध करून दिल्या, ज्यात वार्षिक 36 टक्के वाढ झाली आहे.

‘भारतपे’ने आर्थिक वर्ष 2029 च्या अखेरीस या क्षेत्रात प्रवेश केल्यापासून 12,400 कोटी रुपयांहून अधिक कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

या कामगिरीबद्दल भाष्य करताना, नलिन नेगी, मुख्य वित्तीय अधिकारी आणि अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, भारतपे ऑफलाइन व्यवसाय करणाऱ्या लाखो लोकांना सर्वोत्तम दर्जाची सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती.

देशभरातील एमएसएमई (लघु, कुटीर आणि मध्यम उद्योग) फिनटेक उत्पादनांसह सक्षम बनविण्याच्या दृष्टीने ही श्रेणी तयार करण्यात आली आहे. ही उपलब्धी आमच्या 1.3 कोटी व्यापारी भागीदारांच्या विशाल नेटवर्कचा आमच्यावर असलेला आत्मविश्वास प्रतिबिंबित करते.’

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article