आरसीयु स्पर्धेत भरतेश उपविजेता
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठ आयोजित नवव्या अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत पुरूष गटात 46 गुणांसह भरतेश महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकाविले. सदर स्पर्धेत भरतेश महाविद्यालयाचा खेळाडू भुवन पुजारीने 200 व 400 मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकाविले. सुधान हेगडेने 21 कि.मी. हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. साहील पाटीलने 400 मी. अडथळा शर्यतीत रौप्य पदकाची कमाई केली. बसवराज हळीगौडरने 800 मी. धावण्यात अंतिम फेरीत धडक मारली. पण त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सांघिक खेळात रिलेमध्ये भुवन पुजारी, सदन हेगडे, विनायक व साहील पाटील यांनी 4×400 मी. धावण्याच्या स्पर्धेत रौप्य क्रमांक पटकाविले. या सर्व विजेत्या खेळाडूंना महाविद्यालयाचे चेअरमन हरिचंद्र कळ्ळीमनी, प्राचार्य डॉ. नीता गंगरेड्डी, कृष्णाजी नाडगौडा, प्रदीप जुवेकर यांचे प्रोत्साहन लाभले आहे. या सर्व स्पर्धकांचा संस्थेने गौरव केला.