For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भरतेश कॉलेजच्या क्रीडास्पर्धा उत्साहात

10:58 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भरतेश कॉलेजच्या क्रीडास्पर्धा उत्साहात
Advertisement

बेळगाव : भरतेश कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्सनच्या रौप्य महोत्सव वर्षा निमित्त क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शैक्षणिक उत्कृष्टता व सर्वांगीण विकासाच्या 25 वर्षांच्या प्रवासाचा गौरव करत महाविद्यालय परिसरात हा सोहळा पार पडला.विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. प्रमुख पाहुणे म्हणून मास्टर जितेंद्र काकतीकर उपस्थित होते. यावेळी बोलतना प्रमुख पाहुणे म्हणाले विद्यार्थ्यांना शिस्त, समर्पण आणि एकाग्रतेच्या जोरावर शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात यश संपादन करण्याचे आवाहन त्यांनी केले तर क्रीडा व आत्मसंरक्षण प्रशिक्षणात सक्रीय सहभाग घ्यावा यासाठी विशेषत विद्यार्थिनींनी सहभाग घेण्याचे आवाहन नताशा खानापूरकर यांनी केले. यावेळी डॉ. महेश एम., स्मिता देसाई, जितेंद्र काकतीकर, मंजुनाथ सनदी आदी मान्यवरांसह प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.