For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चौधरी चरण सिंग, नरसिंह राव आणि एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न : पंतप्रधान मोदी यांची घोषणा

01:04 PM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
चौधरी चरण सिंग  नरसिंह राव आणि एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न   पंतप्रधान मोदी यांची घोषणा
Advertisement

केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि पीव्ही नरसिंह राव यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर याची घोषणा केली.

Advertisement

आपल्या सोशल मीडीया वर पोस्ट लिहीताना पंतप्रधानांनी म्हणाले की, देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.