For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदार यादीतील नावाचे स्पेलिंग चुकले अन् ओळख सिद्ध करण्याचे आदेश; भारतरत्न डॉ. सी. एन. आर. राव निवडणूक आयोगाची नोटीस

12:08 PM Sep 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
मतदार यादीतील नावाचे स्पेलिंग चुकले अन् ओळख सिद्ध करण्याचे आदेश  भारतरत्न डॉ  सी  एन  आर  राव निवडणूक आयोगाची नोटीस
Advertisement

बंगळुरू : भारतातील ज्येष्ठ वैज्ञानिक आणि भारत रत्न पुरस्काराने सन्मानित डॉ. सी. एन. आर. राव यांनाही कर्नाटकातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) प्रक्रियेत नोटीस बजावण्यात आली आहे. मतदार यादीतील त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये झालेल्या किरकोळ फरकामुळे ही नोटीस देण्यात आल्याचे वृत्त आहे.

Advertisement

‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, जुन्या मतदार यादीत डॉ. राव यांचे नाव “Prof CNR Rao” असे नोंदवण्यात आले होते. मात्र, नव्या मतदार यादीत ते “Proff CNR Rao” असे नोंदले गेले आहे. ‘Prof’ या पदनामामध्ये अतिरिक्त ‘f’ आल्याने हा फरक ‘self-mismatch’ अर्थात स्वतःच्या नोंदीतील विसंगती म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे.

या प्रक्रियेत मतदारांना त्यांच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी नोटीस बजावली जात आहे. डॉ. राव यांना देखील संबंधित अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

Advertisement

SIR प्रक्रियेत अशा प्रकारच्या विसंगतींमध्ये मतदाराच्या नावाव्यतिरिक्त पालकांच्या नावातील फरक, पालकांच्या वयातील असामान्य अंतर किंवा पालकांच्या मुलांची संख्या यांसारख्या बाबींचाही समावेश केला जातो.

कर्नाटकात एक कोटीहून अधिक नावे वगळली

कर्नाटकात २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या SIRच्या मसुदा मतदार यादीत एक कोटीहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ही संख्या राज्यातील एकूण मतदारांच्या सुमारे १९.४ टक्के आहे.

मतदारांच्या गणना अर्जांमध्ये विसंगती आढळलेल्या किंवा ज्यांची नोंद संबंधित यादीशी जुळवण्यात आलेली नाही, अशा सुमारे ४३ लाख व्यक्तींना नोटिसा पाठवण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने यापूर्वी स्पष्ट केले होते.

मसुदा मतदार यादीतून नाव वगळण्यात आल्यास त्याविरोधात २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अपीलवर २२ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होणार असून, अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

डॉ. सी. एन. आर. राव यांना २०१४ मध्ये घन-अवस्था आणि पदार्थ रसायनशास्त्रातील योगदानासाठी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न प्रदान करण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.