महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत जोडो न्याय यात्रा रविवारपासून

06:28 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मणिपूरच्या थौबल येथून होणार शुभारंभ : काँग्रेस

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

Advertisement

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा आता मणिपूरच्या थौबल जिल्ह्dयातील एका खासगी मैदानातून सुरू होणार आहे. यापूर्वी ही यात्रा मणिपूरची राजधानी इंफाळ येथून सुरू करण्याचा काँग्रेसचा मानस होता. परंतु काँग्रेसने आता यासंबंधी निर्णय बदलला आहे. काँग्रेसची ही यात्रा रविवारपासून सुरू होणार आहे.

मणिपूर सरकारने इंफाळमधील हाप्ता कांग्जेईबुंग मैदानातून यात्रा सुरू करण्याची अनुमती दिली असली तरीही याकरता काही अटी घातल्या होत्या. याचमुळे आम्हाला यात्रा शुभारंभाचे स्थळ अखेरच्या टप्प्यात बदलावे लागले आहे. भारत जोडो न्याय यात्रा इंफाळमधून सुरू करत मुंबई येथे त्याचा समारोप करण्याची आमची योजना होती अशी माहिती मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष केईसम मेघचंद्र यांनी शुक्रवारी दिली आहे.

मुख्यमंत्री एन. विरेन सिंह याची 10 जानेवारी रोजी भेट घेत आम्ही यात्रेसंबंधीची अनुमती मिळाली नसल्याचे सांगितले होते. त्याच  रात्री हाप्ता कांग्जेईबुंग मैदानातून यात्रेचा शुभारंभ मर्यादित संख्येतील लोकांसोबत करण्याची अनुमती देण्यात आली होती. यानंतर राज्य काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने मुख्य सचिव विनित जोशी आणि पोलीस महासंचालक राजीव सिंह, इंफाळ पूर्वचे पोलीस उपायुक्त यांची भेट  घेतली होती.

या अधिकाऱ्यांकडून संबंधित मैदानात एक हजाराहून अधिक लोकांना जमविण्यास मनाई असल्याचे स्पष्ट केले होते. याचमुळे आम्ही अन्य पर्यायांचा विचार सुरू केला होता. थौबल जिल्हाधिकाऱ्यांनी खोंगजोम येथील खासगी मैदानातून यात्रेचा शुभारंभ करण्याची परवानगी दिली असल्याचे मेघचंद्र यांनी सांगितले आहे.

थौबल येथे  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. 14 जानेवारी रोजी मणिपूरमध्ये सुरू झालेली ही यात्रा 20 मार्च रोजी मुंबईत पोहोचणार आहे. तेथेच या यात्रेचा समारोप केला जाणार आहे. राहुल गांधी यांची ही यात्रा एकूण 6713 किलोमीटर अंतर कापणार असून 15 राज्यांमधील 110 जिल्ह्यांना व्यापणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ही यात्रा पायी तसेच वाहनांमधून पार पडणार असल्याचे समजते.

राहुल गांधींचा भाजपवर वार

भारत जोडो न्याय यात्रा सुरू करण्यापूर्वी काँग्रेस नेते नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक वार केला आहे. राष्ट्रीय युवा दिनी आम्हाला स्वामी विवेकानंद यांचे विचार पुन्हा आठवण्याची गरज आहे. युवांची ऊर्जा हीच एका समृद्ध देशाचा आधार आहे तसेच पीडित आणि निर्धनाची सेवा हीच सर्वात मोठी समस्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमच्या स्वप्नांमधील भारताच ओळख काय असेल, जीवनाची गुणवत्ता का केवळ भावुकता याबद्दल युवांनाच विचार करावा लागणार आहे. प्रक्षोभक नारे दारा युवा किंवा रोजगारप्राप्त युवा? प्रेम का द्वेष? आज वास्तविक मुद्द्यांकडे डोळेझाक करत भावनात्मक मुद्द्यांचा राजकीय दुरुपयोग केला जात आहे. वाढती बेरोजगारी आणि महागाईदरम्यान युवा आणि गरीब शिक्षण, कमाई आणि औषधखर्चाच्या भाराखाली दाबला जातोय. तर दुसरीकडे सरकार याला ‘अमृतकाल’ ठरवून उत्सव साजरा करत आहे. सत्तेच्या अहंकारात बुडालेले शहंशाह वस्तुस्थितीपासून अत्यंत दूर गेले आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

अन्यायाच्या या वादळात न्यायाची ज्योत पेटवून ठेवण्यासाठी माझ्यासोबत कोट्यावधी युवा ’न्याय योद्धे’ स्वामी विवेकानंद यांच्या संदेशातून प्रेरणा घेत न्यायाचा हक्क मिळेपर्यंत या संघर्षात सामील होत आहेत. सत्य जिंकणार, न्याय मिळणार असे राहुल गांधी यांनी नमूद केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article