For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : येमेकोंड मतदान केंद्रावर लिंबू-मिरची टाकून भानामतीचा प्रकार; स्थानिक नेत्यांनी निषेध केला व्यक्त

02:42 PM Feb 07, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news    येमेकोंड मतदान केंद्रावर लिंबू मिरची टाकून भानामतीचा प्रकार  स्थानिक नेत्यांनी निषेध केला व्यक्त
Advertisement

                                येमेकोंड मतदान केंद्रावर अंधश्रद्धेचा प्रकार आढळला

Advertisement

किणे वार्ताहर : येमेकोंड मतदान केंद्रावर गेटसमोर लिंबू-मिरची आणि हिरव्या कपड्यात बांधलेला नारळ, हळदी-कुंकू लावलेला भानामतीचा प्रकार आढळून आला. ही घटना सकाळी प्राथमिक शाळेच्या गेटजवळ लक्षात आली, जिथे निवडणूक अधिकारी गोवेकर आणि कर्मचाऱ्यांनी ती आढळून घेतली.

स्थानिकांनी या घटनेला अंधश्रद्धा व बुवाबाजीचा कळस मानले. याबाबत माजी सरपंच तानाजी कातकर, मंगल तिबिले आणि महादेव होडगे यांनी निषेध व्यक्त करत असा प्रकार करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.