For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कस्तुरबा गांधींच्या व्यक्तिरेखेत भामिनी ओझा

06:43 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
कस्तुरबा गांधींच्या व्यक्तिरेखेत भामिनी ओझा
Advertisement

पती प्रतीकसोबत गांधी वेबसीरिजमध्ये झळकणार

Advertisement

खऱ्याखुऱ्या व्यक्तिरेखा साकारणे कलाकारांसाठी नेहमीच आव्हानात्मक असते. अशा स्थितीत महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची भूमिका साकारावी लागल्यास ही जबाबदारी आणखी वाढते. महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित वेबसीरिजची घोषणा झाली असून हंसल मेहता याचे दिग्दर्शन करणार आहेत.

या सीरिजमध्ये महात्मा गांधी यांच्या व्यक्तिरेखेत प्रतीक गांधी असेल. तर कस्तुरबा गांधी यांची व्यक्तिरेखा प्रतीकची पत्नी आणि अभिनेत्री भामिनी ओझा साकारणार आहे. प्रतीक आणि भामिनी यांची खरेखुरे पती-पत्नीचे नाते पडद्यावर प्रतिबिंबित व्हावे अशी निर्मात्यांची इच्छा आहे. कस्तुरबा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणे माझ्या कारकीर्दीतील सर्वात सुंदर गोष्ट आहे असे भामिनीने म्हटले आहे.

Advertisement

ही सीरिज इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांची दोन पुस्तके ‘गांधी बिफोर इंडिया’ आणि ‘गांधी-द ईयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड’वर आधारित असेल. तर सिद्धार्थ बसू या प्रकल्पात ऐतिहासिक सल्लागार म्हणून सामील झाले आहेत. ही सीरिज भव्यस्तरावर निर्माण होणार असल्याने याकरता मोठ्या प्रमाणात खर्च केला जाणार आहे.

Advertisement
Tags :

.