For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भालावलमध्ये जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची पाहणी; दुष्काळसदृश परिस्थितीत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य

04:09 PM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भालावलमध्ये जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची पाहणी  दुष्काळसदृश परिस्थितीत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य
Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी : विकासकामांना गती देण्यासोबतच दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावातील पाणीप्रश्नावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर आणि सावंतवाडीच्या सभापती सुस्मिता जाधव यांनी भालावल गावाला भेट दिली. यावेळी विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

Advertisement

भालावल ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत गावातील पाणीटंचाईसदृश परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपलब्ध पाणीसाठ्याचे संवर्धन, पाणी अडविणे, जलपुनर्भरण तसेच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला.

यावेळी 15 वा वित्त आयोग, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती-जमाती विकास कार्यक्रम आणि VB-GRAM-G यांसह विविध योजनांतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेण्यात आली. प्रलंबित कामांना आवश्यक त्या ठिकाणी गती देण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Advertisement

काजू लागवड आणि बायोगॅस प्रकल्पाची पाहणी

VB-GRAM-G अंतर्गत 2026-27 मध्ये रामचंद्र वामन परब यांच्या क्षेत्रात करण्यात आलेल्या काजू लागवडीची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. लागवडीची स्थिती, कामाची अंमलबजावणी आणि त्याचा लाभ याबाबत संबंधितांकडून माहिती घेण्यात आली.

तसेच याच योजनेअंतर्गत लाभार्थी वसंत महादेव परब यांच्या शेतातील बायोगॅस संयंत्र आणि पशुपालन गोठ्याची पाहणी करण्यात आली. ग्रामीण कुटुंबांना शेती व पशुपालनाच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी अशा योजनांचा प्रभावी लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

शाळा आणि अंगणवाडीचीही पाहणी

जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत बांधण्यात आलेल्या प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीचीही पाहणी करण्यात आली. इमारतीची सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सोयींची माहिती घेण्यात आली.

यानंतर अंगणवाडीला भेट देऊन एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. बालकांना मिळणाऱ्या सुविधा, अंगणवाडीचे कामकाज आणि संबंधित योजनांची अंमलबजावणी याबाबतही माहिती घेण्यात आली.

या पाहणी दौऱ्यात पाणीपुरवठा, जलसंधारण, शेती, ग्रामीण रोजगार व उपजीविका, शिक्षण आणि बालविकास या क्षेत्रांतील कामांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन आणि भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी गावपातळीवर नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

Advertisement
Tags :

.