ईश्वर भक्तीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भजन !
पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांचे प्रतिपादन ; कोलगावात जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे उद्घाटन
ओटवणे प्रतिनिधी
सर्वात सोपा आणि ईश्वर भक्तीचा सहज मार्ग म्हणजे भजन आहे. या भजना स्पर्धेत जिल्हाभरातील अनेक नामांकित मंडळे भजन सादरीकरण करतील पण भजन मंडळानी क्रमांकापेक्षा सादरीकरणाला महत्त्व द्यावे असे आवाहन सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले.कोलगाव श्रीदेवी सातेरी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोलगावचे उद्योजक शैलेश पै, सुनील नाईक, स्पर्धेचे परिक्षक शहाजान शेख गुरुजी, बुवा मोहन मेस्त्री, विनायक ठाकूर, सुरेश राऊत, लक्ष्मण सावंत, नंदू कदम, बुवा अनिल पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक शहनवाज शेख गुरूजी यांनी संत साहित्यातुन संतांची भुमिका नेमकी काय याचे विवेचन करत माणुसकी हा धर्म हिच भुमिका संतांनी मांडली आणि हिच भुमिका घेऊन आपण सगळ्यांनी समाजाला भजनातुन संत विचार देण्याचे महान कार्य आपण भजनी बुवा आणि भजन मंडळे करतात हे खरंच अभिमानास्पद असल्याचे सांगितले. यावेळी सातेरी देवस्थानचे अध्यक्ष चंदन धुरी, प्रकाश धुरी, अनिल धुरी, सदाशिव धुरी, अशोक धुरी, रमेश धुरी, विरेंद्र धुरी, मेघश्याम काजरेकर, राजन म्हापसेकर, समिर धुरी, नंदा धुरी, संजीव धुरी, आनंद धुरी, मुरलीधर धुरी, संजय पाटणकर, अण्णा कावले, नागेश धुरी, गणपत चेंदवणकर आदी उपस्थित होते.या भजन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्गातील नामांकित पाच भजन मंडळानी आपले दर्जेदार सादरीकरण करत स्पर्धेत रंगत आणली. या स्पर्धेत अनेक नामांकित भजनी बुवा ही हजेरी लावली होती. निमंत्रिताच्या या स्पर्धेला भजन रसिकांचाही अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले.