डेगवे स्थापेश्वर मंदिरात ११ रोजी निमंत्रित भजन स्पर्धा
प्रतिनिधी
बांदा
डेगवे श्री महालक्ष्मी स्थापेश्वर मंदिरात सोमवार दिनांक ११ रोजी निमंत्रित भजन मंडळाची भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येथील श्री स्थापेश्वर भजन मंडळ, श्री महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थान समिती व डेगवे ग्रामस्थाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाट्न उद्योजक आनंद गवस यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी पाच वाजता होणार असुन लगेच स्पर्धा सुरु करण्यात येणार आहेत. यात श्री ब्राम्हणदेव प्रासादिक महिला भजन मंडळ, पावशी बुवा - सौ प्रियांका हेमंत तवटे, श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ नेरूर बुवा - भार्गव बाळकृष्ण गावडे तालुका - कुडाळ गाव - नेरूर, विठ्ठल रखुमाई भजन मंडळ आंदुर्ले बुवा अथर्व होडावडेकर ,पखवाज तुषार नागडे तबला सुरज पालव, श्री मुसळेश्वर भजन मंडळ मळेवाड बुवा. श्री राकेश नाईक, श्री रवळनाथ नवतरुण भजन मंडळ, ओटवणे बुवा - आत्माराम कवठणकर ,पखवाज - तुषार नाईक तबला प्राजक्ता परब झांज – ऋतिक सावंत, स्वरधारा संगीत विद्यालय डेगवे.बुवा. वासुदेव सखाराम देसाई या भजन संघाचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेसाठी विविध सांघिक व वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली आहे. या भजन स्पर्धेचा भजनप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्थापेश्वर भजन मंडळ , श्री महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थान समिती व डेगवे ग्रामस्थांनी केले आहे.