विजय देवरकोंडासोबत झळकणार भाग्यश्री बोरसे
हेरगिरीवर आधारित थ्रिलर चित्रपट
विजय देवरकोंडा स्वत:चा आगामी चित्रपट ‘वीडी12’वरून चर्चेत आहे. वीडी 12 च्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाच्या टीझरची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. या चित्रपटाला आता ‘साम्राज्यम’ हे नाव देण्यात आले आहे.
विजय देवरकोंडा हा गौतम थिन्नानुरी यांच्याकडून दिग्दर्शित चित्रपटात दिसून येणार आहे. नागा वामसी यांच्याकडून याची निर्मित केली जात आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
बिगबजेट असणाऱ्या या चित्रपटात विजय देवरकोंडसोबत भाग्यश्री बोरसे दिसून येणार आहे. भाग्यश्रीला ‘मिस्टर बच्चन’मधील भूमिकेसाठी ओळखले जाते. भाग्यश्रीचा नवा चित्रपट हेरगिरीवर आधारित थ्रिलर धाटणीचा असणार आहे. या चित्रपटाला अनिरुद्ध रविचंदर यांचे संगीत लाभणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या केले जात असून हा दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. प्रत्येक भागाची कहाणी वेगळी असणार आहे.