‘कांथा’ चित्रपटात भाग्यश्री बोरसे
मल्याळी सुपरस्टार दुलकर सलमान याचा चित्रपट ‘कांथा’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तसेच चित्रपटाचे मोशन पोस्टरही शेअर करण्यात आले आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भाग्यश्री बोरसे ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे.
कांथा हा चित्रपट 14 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात दुलकर सलमान मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात दुलकर सलमानसोबत समुथिरकानी देखील दिसून येणार असून तो यात अय्या नावाची भूमिका साकारत आहे. अय्या हा दुलकर सलमानच्या व्यक्तिरेखेच पिता असून तो एक फिल्ममेकर देखील आहे. अय्या एक हॉरर फिल्म तयार करू इच्छित असतो. चित्रपटात 1950 चे दशक दाखविण्यात आले आहे. फिल्ममेकर अय्या स्वत:च्या मुलाला हिरो करण्यासाठी धडपड करत असतो. परंतु याचमुळे पिता आणि मुलाच्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि संघर्ष वाढतो. चित्रपट पिता आणि मुलाच्या नात्यातील अनेक पैलू उघड करणारा आहे. तसेच हा चित्रपट सिनेमावरुन काही लोकांचा ध्यासही मांडणारा आहे.