For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीच्या भगवान पांढरेची राज्य क्रिकेट संघात निवड

03:29 PM Jan 11, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीच्या भगवान पांढरेची राज्य क्रिकेट संघात निवड
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी येथील एम क्रिकेट ऍकेडमीचा विद्यार्थी कु .भगवान उमेश पांढरे याची निवड १६ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या विजय मर्चंट ट्रॉफीसाठी झाली आहे .महाराष्ट्राच्या इन्व्हिटेशन लीग मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना केलेली कामगिरी त्यानंतर झालेला सुपर लीग कॅम्प व प्रत्यक्ष निवड चाचणी करता घेतलेल्या मॅचेस यामध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याची निवड करण्यात आली आहे. भगवान पांढरे हा गेली सहा ते सात वर्ष एम क्रिकेट ॲकॅडमी मध्ये क्रिकेटचे धडे घेत असून मुख्य प्रशिक्षक राहुल रेगे ,सहाय्यक प्रशिक्षक अविनाश जाधव , नागेश रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहे. त्याचबरोबर द्रोणाचार्य पूरसाकार विजेते प्रशिक्षक दिनेश लाड यांचे मार्गदर्शन देखील त्याला लाभले असून भगवान पांढरे याला मिळालेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.