For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजगाव येथील भागिरथी धुरी यांचे निधन

माजगाव येथील भागिरथी धुरी  यांचे निधन
Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

Advertisement

माजगाव हरसावंतवाडा येथील रहिवासी भागिरथी तुकाराम धुरी (८३) यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही महिने त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत धुरी कुटुंबियांचे सांत्वन केले. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजगाव येथील तुकाराम धुरी यांच्या त्या पत्नी, सामाजिक कार्यकर्ते के. टी. धुरी तसेच माजगाव उद्यमनगर येथील श्री स्वामी समर्थ फॅब्रिकेशनचे मालक महेश धुरी, ओरोस जिल्हा न्यायालयाच्या अधीक्षक पूजा सावंत, डिंगणे माजी सरपंच स्मिता नाईक यांच्या त्या मातोश्री होत तर बांदा येथील डॉ. एन. वाय. नाईक आणि सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेचे बांदा व्यवस्थापक आबाजी सावंत यांच्या त्या सासू होत.

Advertisement
Advertisement
Tags :

.