भगीरथ शेट्ये यांच्याकडे शिक्षण संचालकपदाचा अतिरिक्त ताबा
11:05 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांच्याकडे शिक्षण संचालकपदाचा अतिरिक्त ताबा सोपविण्यात आला आहे. विद्यमान शिक्षण संचालक शैलेश झिंगडे सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ही जबाबदारी शेट्ये यांच्याकडे देण्यात आली.
Advertisement
राज्य सरकारच्या कार्मिक खात्याने यासंदर्भातील नियुक्ती आदेश जारी केला असून, 1 ऑक्टोबरपासून शेट्ये यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
शेट्ये हे सध्या शिक्षण खात्यात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. कार्मिक खात्याच्या अवर सचिव दुर्गा किनळेकर यांनी याबाबतचा आदेश जारी केला. दरम्यान, शैलेश झिंगडे यांच्या निवृत्तीनिमित्त शिक्षण खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप दिला.
Advertisement
Advertisement