रणवीर अलाहबादीयाच्या कॉन्ट्रवर्सिनंतर 'भाडीपा'ने शो पुढे ढकलला
"सई ताम्हणकर" सोबत होता शो
एकीकडे रणवीर अलाहबादीयाच्या त्या वक्तव्यानंतर सगळीकडे कॉट्रव्हर्सि सुरु असतानाच, दुसरीकडे मराठीतील लोकप्रिय युट्युब चॅनेल भाडीपा ने आपला कार्यक्रम पुढे ढकल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान भाडीपा (भारतीय डिजिटल पार्टी) चे संस्थापक सारंग साठ्ये याने इन्स्टाग्रामवरत त्यांचा आगामी कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगितले आहे. हा कार्यक्रम १४ फेब्रुवारीला होणार होता. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण अभिनेत्री सई ताम्हणकर होती.
इन्स्टाग्रामच्या या पोस्टमध्ये असे लिहीले आहे, "भाडिपाच्या फॅन्सना कळवण्यात वाईट वाटत आहे की, सध्या वातावरण तापल्यामुळे, १४ फेब्रुवारीला होणारा अतिशय निर्लज्ज- कांदेपोहेचा शो आम्ही पोस्टपोन (पुढे ढकलणे) करत आहोत. तसंही व्हॅलेन्सटाईन्स डे ला प्रेमापेक्षा जास्त द्वेषच मइळतो. पण आमचं आमच्या फॅन्सवर प्रेमच आहे. आमच्या टॅलेंट ला आणि प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे."
या पोस्टमध्ये पुढे असे नमूद केलेले आहे, की "अतिशय निर्लज्जपणे आमचा हा सभ्य शो लवकरंच घेऊन येऊ. आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न केला.... पण तुमचा यंदाचाही व्हॅलेनटाईन्स डे घरीच बसून जाणार!"