कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Bhadgaon Matdar Sangh 2025: गुप्त हालचालींना सुरुवात, नेतेमंडळी कोणाला संधी देणार?

12:22 PM Jun 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भडगाव गट, गणात इतरांप्रमाणेच सैनिक संघटनेची भूमिका महत्वाची ठरणार?

Advertisement

By : प्रकाश चौगले

Advertisement

महागाव : आतापर्यंत भडगाव गटात व महागाव, भडगाव गटांत राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, ताराराणी आघाडी यांचे वर्चस्व राहिले आहे. भडगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर महागाव गटात पाटील-पताडे या पारंपरिक प्रतिस्पर्धीमध्ये लढत झाली आहे.

यामध्ये पाटील गटांनीच बाजी मारली आहे. पण सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट, विधानसभा निवडणुकीत आमदार शिवाजीराव पाटील यांना सैनिक संघटनेची मिळालेली ताकद, त्यामुळे या भडगाव गट, गणात इतरांप्रमाणेच सैनिक संघटनेची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

त्यामुळे आगामी निवडणुकीत सैनिक संघटनेची भूमिका काय राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पहली असली तरी माजी आमदार राजेश पाटील, डॉ. नंदाताई बाभुळकर, अप्पी ऊर्फ विनायक पाटील यांनी जोराची टक्कर दिली आहे.

भडगाव जिल्हा परिषद गटात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, जनता दल, ताराराणी आघाडी यांचे वर्चस्व राहिले आहे. महागाव गणात पंचायत समितीच्या स्थापनेवेळचे पहिले सभापती शिवगोंडराव पाटील व त्यांचे पुत्र, माजी सभापती विजयराव पाटील यांच्या कालावधीत काही वर्षे वगळता महागावच्या पाटील घराण्याचे वर्चस्व राहिले आहे.

जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी ऊर्फ विनायक पाटील यांनी या गणाचे नेतृत्व करत पंचायत समितीचे उपसभापतीपद भूषवले होते. त्यानंतर आपल्या गटाच्या रजनी नाईक, माजी सभापती विजयराव पाटील यांना संधी देत निवडून आणले. जिल्हा परिषदेलाडी त्यांनी सर्वांना धक्का देत आपला उमेदवार निवडून आणला होता, हा इतिहास आहे.

त्यामुळे येत्या निवडणुकीत अप्पी पाटील हे आपल्या घरातील उमेदवाराला पसंती देणार की नवा कार्यकर्ता पुढे करत कोणाला संधी देणार, हे पहावे लागेल. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राजेश पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी डॉ. नंदाताई बाभुळकर यांचा प्रचार केला.

या गटात विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका चालू आहे. त्यामुळे माजी आमदार पाटील आणि राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मर्जीतील उमेदवार रिंगणात येईल, यात शंका नाही. तसे झाल्यास गोडसाखरचे चेअरमन प्रकाश पताडे यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक दिसते.

विधानसभेचे माजी अध्यक्ष कै. बाबासाहेब कुपेकर यांना मानणारा मतदार या मतदारसंघात असल्याने डॉ. बाभुळकर यांना विधानसभा निवडणुकीत चांगले मतदान घेता आले. सध्या जिल्हा परिषद मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून अमर चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे.

जनसुराज्य पक्षाचे मानसिंग खोराटे व दोन्ही शिवसेनेमध्ये कोणाच्या पत्त्यावर पडणार हे पाहणे गरजेचे आहे. प्रशासकराज्य असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम ऑक्टोबरमध्ये वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात नेसरी, हलकर्णी, नूल, भढगान या जिल्हा परिषद मतदारसंघाचा समावेश होतो.

पैकी भडगाव जिल्हा परिषव गट खुला तर त्याअंतर्गत येणाऱ्या महागाव पंचायत समिती गण (महिला) आणि भढगान पंचायत समिती गण (खुला) असल्याने यावेळी तीनही ठिकाणी चुरशीची लढत पहागयास मिळणार आहे. इच्छुकांनी उघडपणे प्रचार सुरू केला नसला तरी गुप्त हालचाली गतिमान झाल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पक्ष व गट आपली ताकव आजमावण्यासाठी आपल्या मर्जीतला उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसणार आहे. या मतदारसंघात नेतेमंडळी कोणाला संधी देणार, याचेच औत्सुक्य सर्वांना आहे.

Advertisement
Tags :
#congress#mahagav#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#vidhansabhaappi patilBhadgaon Matdar Sangh 2025NCPZP election 2025
Next Article