5 कोटी समभागांची विक्री करणार अॅमेझॉनचे सर्वेसर्वा बेजोस
नवी दिल्ली :
आगामी काळात पुढील बारा महिन्यांमध्ये अॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेजोस पाच कोटी समभाग विक्री करणार असल्याची माहिती आहे. अमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेजोस हे पुढील वर्षी कंपनीचे कमीत कमी पाच कोटी समभाग विक्री करण्याची योजना बनवत आहेत. सदरची विक्री करण्याकरता काही अटी शर्तीही लागू केल्या जाणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अलीकडेच बेजोस यांनी वयाची साठ वर्षे पूर्ण केली आहेत. बेजोस यांच्याकडे एक अब्ज समभाग आहेत.
इतकी झाली प्राप्ती
अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस सेवेअंतर्गत वर्षाच्या आधारावर कंपनीला 13 टक्के वाढ नोंदवता आली आहे. यायोगे या सेवेअंतर्गत 24.2 अब्ज डॉलरची प्राप्ती कंपनीने केली आहे. बेजोस यांच्या एकंदर संपत्तीमध्ये अॅमेझॉनच्या समभागांचा वाटा 193.3 अब्ज डॉलर्सचा राहिलेला आहे. 31 डिसेंबर 2023 ला दुसऱ्या तिमाहीमध्ये अॅमेझॉनने 14 टक्के वाढीसह 170 अब्ज डॉलरची प्राप्ती केली आहे. कंपनीचे याच तिमाहीतील निव्वळ उत्पन्न 10.6 अब्ज डॉलर्स इतके दिसून आले आहे.