For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

उष्मालाटेपासून सावधान

06:58 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
उष्मालाटेपासून सावधान

केंद्र सरकारकडून महत्त्वाची बैठक : भीषण उष्णतेच्या इशाऱ्यादरम्यान राज्यांना दिशानिर्देश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हवामान विभागाने यंदा भीषण उष्णतेचा इशारा जारी केला आहे. यावरून केंद्र सरकार देखील आतापासून अॅक्शन मोडमध्ये आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी महत्त्वाची बैठक घेतली आहे. यात हवामान विभाग, आरोग्य विभाग आणि  आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी सामील झाले. समीक्षा बैठकीत आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारच्या वतीने राज्य सरकारांना दिशानिर्देश जारी करण्यास सांगितले आहे.

Advertisement

हवामान विभागाने चालू वर्षासाठी अल-नीनोचा अनुमान व्यक्त केला आहे आणि याचमुळे यंदा उष्णता लाटेची शक्यता अधिक आहे असे उद्गार मनसुख मांडविया यांनी बैठकीनंतर काढले आहेत. यंदा तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. यंदाचे वर्ष निवडणुकांचे आहे आणि उष्मालाटेपासून वाचण्यासाठी हवामान विभाग, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांसोबत विस्तृत समीक्षा केली. तसेच केंद्राच्या वतीने राज्य सरकारांना दिशानिर्देश जारी करण्यास सांगितले असल्याची माहिती मांडविया यांनी दिली आहे.

Advertisement

हवामान विभागाने दक्षिण बंगालमध्ये 6 एप्रिलपर्यंत लूचा इशारा जारी केला आहे. तेथे पुढील काही दिवस कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. देशभरात एप्रिल ते जूनपर्यंत अत्याधिक उष्णता राहण्याची शक्यता आहे, याचा मध्य आणि पश्चिम भारतावर गंभीर प्रभाव पडणार आहे.

उष्मालाटेने उष्माघाताचे रुप धारण करू नये याकरता  अनेक दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. हीटस्ट्रोकमुळे होणारे आजार अत्यंत गंभीर आहेत. शरीर स्वत:च्या तापमानाला नियंत्रित करू न शकल्यावर ही स्थिती उद्भवते. दरवर्षी उन्हाळ्यात जितके तापमान असते, त्यापेक्षा यंदा अधिक तापमान राहण्याचा अनुमान आहे. हे पाहता जनतेला विशेष खबरदारी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. निवडणूक प्रचारासाठी घराबाहेर पडल्यावर पाणी पित रहावे तसेच स्वत:सोबत पाण्याची बाटली बाळगावी. लोकांनी वेळोवेळी पाणी पिण्यासह फळांच्या रसाचे सेवन करावे. याचबरोबर निंबू पाणी देखील प्यावे. उन्हाळ्यात प्राप्त होणारी फळे देखील उपयुक्त ठरू शकतात असे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे.

हवामान विभागानुसार गुजरात, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तर छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशात उष्णतेचा सर्वाधिक प्रभाव दिसून येणार आहे. एप्रिल ते जूनदरम्यान देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
×

.