For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावधान! फ्रान्समध्ये नोकरीचे आमिष नडले; कवठेमहांकाळच्या तरुणाची ४ लाखांची फसवणूक

02:19 PM Apr 29, 2026 IST | NEETA POTDAR
सावधान  फ्रान्समध्ये नोकरीचे आमिष नडले  कवठेमहांकाळच्या तरुणाची ४ लाखांची फसवणूक
Advertisement

                      सायबर भामट्यांनी परदेशातील नोकरीच्या नावाखाली घातला ४ लाखांचा दरोडा

Advertisement

कवठेमहांकाळ : परदेशात उच्चपगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथील कदमवाडीतील शिवाजी विठोबा खांडेकर (वय-४०) यांची सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, कदमवाडी येथील शिवाजी खांडेकर यांची फेसबुकच्या माध्यमातून जानेवारी २०२५ मध्येनितीन राणा या फेसबुक खात्यावरील व्यक्तीशी ओळख झाली. राणाने विश्वास संपादन करत फ्रान्स येथे शेती व्यवसायात दरमहा ३ लाख रुपयांची नोकरी लावतो असे खांडेकर यांना सांगितले.

उच्च पगाराच्या आणि परदेशातील नोकरीच्या आमिषाने खांडेकर यांनी नितीन राणाच्या सांगण्यावरून स्वतःच्या नावावर एचडीएफसी बँकेत खाते उघडले. आरोपीने खांडेकर यांना खात्यात टप्याटप्याने पैसै भरायला सांगितले. आरोपीने खांडेकर यांना सिमकार्ड,बैंक एटीएम आणि बैंक स्टेटमेंट्स मुंबईतील मनिष कुमार यांना देण्यास सांगितले. वर्ष उलटून गेले तरी नोकरीसाठी राणा याच्याकडून संपर्क झाला नाही म्हणून खांडेकर यांनी फेब्रुवारीमध्ये विचारणा केली असता राणाने त्यांचा फोन ब्लॉक केल्याचे कळाले. फसवणूक झाली आहे याचा संशय खांडेकर यांना आल्यावर चौकशी केली असता त्यांच्या खात्यावरील ४ लाख रुपये काढल्याचे त्यांना कळाले. पोलिसात फिर्याद दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.