ऑस्ट्रेलियन हॉल ऑफ फेममध्ये बेव्हनचा समावेश
वृत्तसंस्था / मेलबोर्न
ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्रामध्ये एक दर्जेदार फलंदाज म्हणून ओळखला जाणारा माजी फलंदाज मायकेल बेव्हनच्या तैलचित्राचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट ऑल ऑफ फेममध्ये समावेश करत त्याच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला.
क्रिकेटच्या वनडे प्रकारात मायकेल बेव्हन फिनीशर म्हणून ओळखला जात असे. 54 वर्षीय बेव्हन 1999 आणि 2003 च्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळविणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा सदस्य होता. त्याने 232 वनडे सामन्यात 53.58 धावांच्या सरासरीने 6912 धावा जमविल्या. तो ऑस्ट्रेलियन संघात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस येत असे. 1994 ते 2004 या दशकामध्ये बेव्हनने आपल्या कामगिरीत सातत्य राखत ऑस्ट्रेलियाला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट ऑल ऑफ फेममध्ये आपल्या तैलचित्राचा समावेश करुन गौरव केल्याबद्दल बेव्हनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार मानले आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 6 शतके आणि 46 अर्धशतके नोंदविली आहेत. बेव्हनने 1994 साली आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने 1998 पर्यंत 18 कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले.